Thursday, 27 October 2022

फिरकीचा तांब्या (प्रकाश तांबे)

वल्लरी प्रकाशनचे नवे पुस्तके : फिरकीचा तांब्या

फिरकीचा तांब्या
लेखक: प्रकाश तांबे
वल्लरी प्रकाशन, पुणे मो. 9422442407
आयएसबीएन: 9788195746736
पृष्ठे: १३६/- । मूल्य: रुपये २५०/- (फ्री डिलीव्हरी)

पुस्तक खरेदीसाठी Pay Now वर क्लिक करा:

वैविध्यपूर्ण भावभावनांमुळे मानवी आयुष्य समृद्ध होत असते. हास्यामध्ये पर्यवसित होणाऱ्या जीवनविषयक सुखात्म जाणिवेची प्रचिती देणारी भावना म्हणजे विनोद.  रंजनाचे व्यावसायिकीकरण होत असताना आशयामध्ये कमालीची तडजोड केली जात आहे.  विशेषत: विनोदी आशय निर्मिती करताना विनोद आणि अश्लीलता  यांच्यातील सीमारेषा धूसर केली जात आहे. अशा परिस्थितीत अश्लीलता  वगळून निखळ, निर्मळ आणि निर्विष ‘फिरकीचा तांब्या’चे महत्त्व अधोरेखित होते.  लेखक प्रकाश तांबे यांचा हा विनोदी लेखांचा संग्रह अत्यंत कल्पक, सृजनशील आणि नाविन्यपूर्ण विनोदी लेखनाने फुलला आहे. हे लेख वाचून वाचकांच्या गालावर हास्यलकेर झळकेल यात शंका नाही.  हा ‘फिरकीचा तांब्या’ वाचनीय, रंजनीय, संग्रहणीय आहे.

दररोजच्या जगण्यातील उणिवा किंवा रिकाम्या जागा शोधून लेखक तांबे यांनी या पुस्तकात विनोदी दृष्टिकोनातून बारकावे टिपले आहेत. अनेक लेख वाचताना वाचक स्वत:ला त्यात पाहतो आणि त्यामुळे विनोदाची तीव्रता अधिक जाणवते. हे पुस्तके कुटुंबात लहानांसह सहजपणे कोणत्याही संकोचाविना वाचता येईल. तर मित्र-मैत्रिणींमध्येही पुस्तक वाचताना खळखळून हसण्याचा आनंद घेता येईल.

रिल्स, स्टोरीज आणि स्मार्ट फोनमधील गेम्सचे आकर्षण असलेल्या पिढीला विशेषत: शाळेत, कॉलेजात जाणाऱ्या पिढीला मराठी वाचनाचा निखळ आनंद देणारे हे पुस्तके आपल्या संग्रहात असायलाच हवे.

पुस्तक खरेदीसाठी Pay Now वर क्लिक करा:


फिरकीचा तांब्या

लेखक: प्रकाश तांबे
वल्लरी प्रकाशन, पुणे मो. 9422442407
आयएसबीएन: 9788195746736
पृष्ठे: १३६/- । मूल्य: रुपये २५०/- (फ्री डिलीव्हरी)



पुस्तकाचा Preview येथे दिला आहे.


पुस्तक खरेदीसाठी Pay Now वर क्लिक करा:

0 comments:

Post a Comment